Friday 1 June 2007

सर्ग 1-10



Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग पहिला: धर्म
सर्ग : प्रभुस्तुती
अकार ज्याप्रमाणे शब्दसृष्टीचा आरंभ, त्याप्रमाणे तों पुराणपुरुष चराचराचा आरंभ आहे.
त्या ज्ञानस्वरूप परमात्म्याची तू पूजा करणार नसशील, तर तुझ्या या ज्ञानाचा उपयोग काय ?
भक्तांच्या हृदयपुष्पांदरून चालणान्या त्या प्रभूच्या चरणांचा जो आश्रय करतो, तो चिरंजीव होतो.
तिरस्कार वा स्वीकार यांच्या अतीत असणान्या त्या प्रभूच्या चरणांशी चिकटून
बसलेले ते भक्त; जीवनातील आधिव्याधी त्यांना कधी स्पर्शू शकणार नाहीत.
प्रभूचे स्वतन मनापासून करणारे ते भक् बघ; भल्या-बुन्या कर्मांची फळे अतःपर त्यांना भोगावी लागणार नाहीत ते मुक् होतील.
ईश्वराने घालून दिलेल्या सन्मार्गाने जे जातात, इंद्रियांच्या इच्छा ज्यांनी जाळून टाकल्या, त्यांना पुनर्जन् नाही.
अद्वितीय असा जो तो प्रभू, त्याच्या पदकमलाचा आश्रय करणारेच दुःखमुक् होतात.
सत्यज्ञानाचा सिंधू असा जो योगीन्द्र, त्याच्या चरणाशी जे जडले ते या प्रक्षुब्ध
भवसागरातून तरून जातात.
अष्टगुणसंपन्न अशा त्या प्रभूच्या चरणांना जो वंदन करीत नाही, त्या चरणांपुढे ज्याचे डोके लवत नाही, ते डोके नसून खोके आहे.
१०
प्रभुचरणाचा आश्रय करणारेच जन्म-मरणाचा फरे. चकवू शकतात इत रांना ते शक्य नाही.

सर्ग : पर्जन्यस्तुती
११
चुकता येणारी ही पर्जज्यवृष्टी पृथवीचे धारण करते. पर्जन्यवृष्टी म्हणजेच अमृत असे समज.
१२
चवीला गोड वाटणारे हे नाना प्रकारचे अन्न म्हणजे पर्जन्याची मानवाला मिळालेली देणगी आहे; आणि ते पाणीही मानवाच्या अन्नातील, आहारातील भाग बनते.
१३
पाऊस पडेल तर ही समुद्रवलयांकित पृथ्वी उग्र दुष्कालाने उद्ध्वस्त होईल.
१४
आकाशातील हे झरे जर आटले, तर शेतकरी हातात नांगर घरणार नाही.
१५
पाऊस नाशही करतो; पाऊसच जगवतो, तगवतो.
१६
आकाशातील हे झरे जर आटले, तर हे चिमणे गवतही वाढणार नाही.
१७
समुद्राचे पाणी वर घेऊन ते पुन्हा खाली सोडण्याचे आकाशाने नाकारले, तर हे प्रचडं सागरही नासून जातील.
१८
जर आकाश कोरडे राहिले, तर देवांना हविर्भाग मिळणार नाही, पृथ्वी उत्सव, सामारंभ होणार नाहीत.
१९
आकाशाने पाणी पाठविले नाही, तर या विशाल पृथ्वीवर दया, तपस्या, ही दिसणार नाहीत.
२०
पाणी नसले तर जीवनच नाही. म्हणून संतांचे थोर वर्तनही अंती पावसावरच अवलंबून आहे.

सर्ग : निःसंगाचा मोठेषणा
२१
भोगविलास सोडणारे आणि प्रखर वैराग्याने राहणारे ते लोक बघ; इतर सर्व चांगल्या गोष्टींपेक्षा आस्त्रपुराणांना अशांचीच कैर्ती गायला आवडते.
२२
विरक्त निःसंग पुरुषाचा पार तुला लागणार नाही. तसे तुला करता आले, तर आजपर्यतच्या सर्व मृतांचीही मोजदाद तुला करता येईल.
२३
इहपराची तुलना करून ज्यांनी ऐहिकाचा त्याग केला, असे ते लोक बघ; त्यांच्या तेजाने ही पृथ्वी धवळली आहे.
२४
अंकुशाने हत्तीला ताब्यात ठेवावे, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवणारा तो नरपुंगव पाहा. स्वर्गीय शेतात पेरणी करण्यासरखा तो दाणा आहे.
२५
ज्याने वासनांवर जय मिळविला, त्याची शक्ती जाणण्याची तुला इच्छा आहे? तर मग देवेन्द्राकडे पाहा. हे एक उदाहरण बस्स आहे.
२६
असाध्याला साध्य करून धॆणारे धन्य होत. तेच खरे महात्मे. ज्यांना हे साधत नाही, ते ख्ररे दुबळे
२७
शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या पंचेंद्रियांच्या विषयांची खरी किमत ज्याने ओळखली आहे असा तो पुरुष पाहा. सान्या जगावर तो सत्ता गाजवील.
२८
ज्याच्या वाणीत अपार सामर्थ्य आहे, अशा या पुरुषाच्या मिठिपणाची स्तोत्रे वेद-पुराणे गात असतात.
२९
वैराग्याच्या दृढ आधारावर जे उभे आहेत, त्यांची वक्रदृष्टी कोण सहन करील?
३०
ब्राह्मण तो, जो त्यागी निःसंग आहे. याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. कारण प्राणिमात्राविषयी त्याला दया असते.

 सर्ग :सदाचारमाहात्म्य
३१
सदाचरने मोक्षही मिळतो अर्थप्राप्तीही होते. असे जर आहे, तर सदाचाराहून अधिक हितकर असे दुसरे काय बरे आहे?
३२
सदाचाराहून अधिक चांगले दुसरे काही नाही; सदाचार-त्यागासारखे हानिकारक दुसरे काही नाही.
३३
सत्कर्में करण्यात कधी खंड पाडू नकोस; सारी शक्ती वेचून सत्कर्में करीत राहा.
३४
मनाने शुद्ध राहा. हृदयशुद्धीत सारा सदाचार सामावलेला असतो; बाकी गोष्टी म्हणजे दंभ होय
३५
मत्सर, क्रोध, लोभ आणि कठोर वाणी यांचा त्याग कर. सदाचार-संपादनाचा हा राजमार्ग आहे.
३६
हळहळू मी सदाचारी होईन, असे नको मनात म्हणू. विलंभ लावता एकदम सदाचारास आरंभ कर. मरणाच्या दिवशी सदाचार हाच तुझा चिरमित्र असेल.
३७
मनुष्य सदाचारी असल्यावर त्याचे कोणते कल्याण होईल, ये नको मला विचारू पालखीत बसणारा नि पालखी खांध्यावरून वाहणारा पाहा म्हणजे झाले! (पूर्व-सुकृताचा परिणाम)
३८
एक क्षणही फुकट दवडता जर तॊ जन्म भर सत्कृत्ये करीत राहशील, तर जन्ममरणाचा सारा रस्ता चालून गेल्याप्रमाणे होईल.
३९
सदाचाराने जो आनंद मिळतो, तोच आनंद खरा; बाकीचे आनंद आणि बाकीची सुखे ही शेवटी रडवतात, फजीत करतात.
४०
तेच कृत्य करावे, जे सदाचारमूलक आहे. शहणे लोक ज्यामुळे तुझी निंदा करतील, असे काहीही करू नकोस.

 सर्ग : कौटुंबिक जीवन
१४
इतर तीन आश्रमांचा मुख्य आधार गृहस्थाश्रम हा आहे.


४२
पितरांचा नि अनाथांचा गृहस्थाश्रमी मनुष्य मित्र आहे. संन्याशांचा तो सखा आहे.
४३
गृहस्थाची पाच कर्तव्ये आहेत: पितृतर्पण, देवतर्पण, अतिथिसत्कार, आप्तेष्टमित्रांस साहाय्य, आणि स्वतःचीही काळजी धेणे.
४४
शहाण्या लोकांनी नावे ठेवू नयेत म्हणूण जो जपून वागतो, स्वतः जेवण्यापूर्वी जो दान कर्तो, अशाचा वंशतंतू कधी तुटत नसतो.
४५
ज्या धरात सदाचार आहे आणि भरपूर प्रेम आहे, ते घर कृतार्थ झाले.
४६
गृहस्थश्रमातील कर्तव्ये नीट पार पाडाल, तर दुसन्या आश्रमांची काय गरज?
४७
गृहस्थश्रमातील सारी कर्तव्ये पार पाडणारा, सदाचाराने कुटुंब चालवणारा, तो खरा साधक होय. मुमुक्षूंत त्याचे स्थान पहिले आहे.
४८
दुसन्यांना त्यांच्या व्रतपालनात जो साहाय्य देतो स्वतः सदाचाराने वागतो, असा गृहस्थाश्रमी मनुष्य उपासतापास करून ईश्वराची प्रार्थना करीत बसणान्यांहून अधिक थोर संत होय.
४९
सदाचार हा विशेषेकरून गृहस्थाश्रमातच असतो; सच्छील हे वैवाहिक जीवनाचे भूषण आहे.
५०
यथायोग्य वागणारा गृहस्थधर्मी मनुष्य मनुष्यांतील देवच होय.

सर्ग : सद्गुणी भायेंचे सुख
५१
पतीच्या शक्तीबाहेर जी खर्च करीत नाही, पत्नीला आवश्यक असे सारे सद्गुण जिच्याजवळ आहेत, तीच संसारात खरीखुरी मदत करू शकेल.
५२
पत्निधर्मापासून पत्नी च्युत झाली, तर बाकीची सुखे असून नसल्यासारखीच होतात.
५३
अनुरूप नि योग्य पत्नी असल्यावर कसली आहे वाण? परंतु पत्नीमध्ये योग्यता नि पात्रता नसेल, तर इतर धनसंपदा असून तरी काय उपयोग.
५४
जर पत्नी पातिव्रत्याच्या सामर्थ्याने संपन्न असेल तर तिच्याहून अधिक धीरॊदात्त असे जगात दुसरे काय आहे?
५५
सकाळी उठल्यापासून देवांचीही पूजा करता जी पतिदेवाची पूजा करू लगते, अशा सतीचे सामर्थ्य पाहा. आकाशातील मेघसुद्धा तिची आज्ञा पळतात.
५६
सद्गुण नि सत्कीर्ती यांना जपणारी, प्रेमळपणाने पतीची काळजी वाहणारी ती खरी गृहिणी होय
५७
घरात कोंडल्याने काय होणार आहे? स्त्रीचे सद्गुण तिच्या सतीत्वाचे उत्कृष्ट रक्षण करतात.
५८
अनुरूप पुत्राला जन्म देणारी ती माता पाहा. अहाहा!
देवलोकी तिला परमोच्च पद मिळत असते.
५९
ज्याच्या घराची अबू गेली, त्याची दशा काय सांगावी? उपहास करणान्यासमोर सिंहाप्रमाणे छाती वर करून, मान वर करून त्याला कधीही चालता येणार नाही.
६०
घरातील परमानंद म्हणजे गृहिणीचे सच्छील आणि घराचे परमभाग्य म्हणजे सत्संतती.

सर्ग : संतती
६१
शहाणी हुशार मुले याच्यासारखे सुख नाही.
६२
ज्याची मुलेबाळे धुतल्या तांदळाप्रमाणे निर्दोष आहेत, त्याला सात जन्मांत दुःख नाही, त्याला सात जन्मांत अशुभ शिवणार नाही.
६३
मुलेबाळे हीच माणसाची खरी संपत्ती. मुलेबाळे स्वतःच्या कृत्यांनी जे पुण्य मिळवतील, ते आईबापांना लाभत असते.
६४
मुलाच्या कोवळचा हातांनी इकडे तिकडे विखुरलेले अन्न अमृताहूनही गोड असते.
६५
मुलाचा स्पर्श हे शरीराचे सुख आहे, बोबडे बोल हे कानांचे सुख आहे.
६६
ज्यांनी आपल्या लहानग्यांचे बोबडे बोल ऐकले नाहीत, तेच बासरी मधुर असते, वाणी गोड असते, असे म्हणतात.
६७
पित्याचे पुत्रासंबंधी कर्तव्य कोणते? सभेत पहिल्या रांगेत बसण्याइतपत त्याला लायक करणे.
६८
आपल्या मुलांनी आपल्याहून मोठे व्यावे असे पित्याला वाटत असते.
६९
पुत्र जन्माला आला एवढचानेही मातेला आनंद होतो, परंतु मुलाची कीर्ती ऐकून तिला जो आनंद होतो, त्याला सीमा नाही.
७०
पुत्राचे पित्यासंबंधी कर्तव्य कोणते? कोणत्य पूर्वपुण्याईने असा पुत्र तुम्हाला मिळाला, असे सारे जग आपल्या पित्याला विचारील अशा रीतीने वागणे.

सर्ग :प्रेम
७१
प्रेमाचे दरवाजे बंद करणारा आडसर कोठे आहे? परस्परांवर प्रेम करणान्यांच्या डोळचांत जमणारे आश्रू सान्या जगाला प्रेमाचे अस्तित्व जाहीर करीत असतात.
७२
प्रेम कर्णारे केवळ स्वतःपुरते जगतात; परंतु प्रेम करणारे स्वतःची हाडेही दुसन्यांच्या साहाय्यासाठी देऊन टाकतील
७३
प्रेमाची माधुरी पुन्हा चाखायला मिळावी म्हणूण्या अस्थिचर्ममय पिजन्यात बद्ध व्हाअयला आत्मा पुन्हा तयार झाला, असे ते म्हणतात.
७४
प्रेमामुळे सान्या मानवजातीबद्दल आपल्याला ममता बाटते, प्रेमामुळे आपण कोमल बनतो आणि हृदयाच्या कोमळतेतूनच मैत्रीचा अमोल ठेवा जन्माला येतो.
७५
गतकाळतील प्रेमळ कोमळपणाचे देवाने दिलेले बक्षीस म्हणजेच थोरामोठचांचे मिळणारे मंगल आशीर्वाद होत.
७६
सद्गुणी लोकांविषयीच फक्त प्रेम दाखवावे, असे म्हणणारे मूर्खाहेत. कारण दुष्टांपासूनही बचाव करणारा प्रेम हाच एक खरा मित्र आहे.
७७
केवल मांसमय प्राण्यास (चरबीयुक्त प्राण्यास) सूर्य कसा जाळतो ते पाहा. त्याप्रमाणे जो प्रेम करणार नाही, त्याला सदाचार जाळील.
७८
प्रेम माहीत नसणान्याचे हृदय पाहा. वाळवंटातील सुकलेल्या खोडास जेव्हा अंकुर फुटतील, तेव्हाच अशा माणसास भाग्य म्हणजे काय, ते कळेल.
७९
प्रेम हे हृदयाचे नि जीवनाचे भूषण आहे. प्रेम नसेल तर बाहेरचे सौन्दर्य काय  कामाचे?
८०
प्रेम म्हणजे जीवनाचे जीवन. ज्याच्याजवळ प्रेम नाही तो केवल अस्थिचर्ममय सांगाडा होय.

सर्ग : अतिथि-सत्कार
८१
धडपड करून शहाणे लोक घरे का बांधतात? पाहुण्याला जेवण देता यावे वाटसरूला आधार देता यावा म्हणून.


८२
ओटीवर अतिथी आलेला असता, अमृताचा घोट असला तरीही गृहस्थ एकटयाने पिणार नाही.


८३
आलेल्या अतिथीचा सत्कार करायला जो चुकत नाही, त्याला अशुभ शिवत नाही.


८४
आलेल्या अतिथीचा जो हसतमुखाने सत्कार करतो, त्याच्या घरी राहण्यात लक्ष्मीला कृतार्थता वाटते.


८५
जो आधी अतिथीला जेवू घालतो आणि अवशिष्ट स्वतः खातो, त्याला कधीतरी पेरण्याची जरूरी भासेल का? (सारे भाग्य त्याच्याकडे आपोआप येईल).


८६
जाणान्या अतिथीची नीट काळजी जो घेतो आणि आलेल्या अतिथीची सेवा करतो, त्याचा देवही सत्कार करतात.


८७
अतिथि-सत्काराविषयी नाना गोष्टी आम्ही सांगत नाही; तसे सांगणे कमीपणाचे आहे, अतिथि-सत्कार म्हणजे महापुण्य, एवढे खरे! आणि अतिथी ज्या मनाने थोर, त्या मनाने होणारा यज्ञही मोठा.


८८
जो अतिथि-सत्काररूप पज्ञ करीत नाही, त्याला एके दिवशी दुःख करीत बसण्याची पाळी येईल. तो म्हणेल, मी मरेमरेतो काम केले, धनदौलत साठविली; परंतु उपयोग काय? मला सुखसमाधान घ्यायला कोणी नाही.


८९
अतिथि-सत्कार करणार नसाल, तर गजान्तलक्ष्मी दारी असूनही खरोखरच तुम्ही दरिद्रीच आहात. मूर्ख लोकांचीच फक्त अशी स्थिती आढळते.


९०
सोनटक्क्याचे फूल वास घेण्याने, नाकाजवळ नेण्यानेच कोमेजून जाते; परंतु अतिथीकडे नुसते पाहण्यानेही त्याचे हृदय फुटून जाण्याचा संभव असतो.

सर्ग १०: खुपणारी वाणी
९१
सुस्वभावी, सदाचारी मनुष्याची वाणी कोमल प्रेमल असते. तिच्यात दंभ नसतो, वंचना नसते.
९२
उदाराच्या मोठया देणगीपेक्षाही गोड वाणी नि प्रसन्न प्रेमळ दृष्टी अधिक श्रेष् आहेत.
९३
हृदयापासून येणान्या कोमल नि प्रेमळ शब्दांत, त्याचप्रमाणे प्रसन्न दृष्टीत सदाचाराचे माहेर असते.
९४
सर्वांजवळ जो गोड बोलल, त्याला दुःखवर्चक दारिद्र्य कधी शिवणार नाही.
९५
विनय आणि गोड गोड वाणी हीच माणसाची खरी भूषणे; दुसरी नाहीत.
९६
जर तुझे विचार पवित्र असतील, तुझी वाणी मृदू दयामय असेल, तर तुझ्यामधील असत्भाव कमी होत आहे आणि सत्प्रवृत्ती बाढत आहेत असे समझ.
९७
प्रेमळ हितकार बोलण्याने मित्र जोडले जातात आणि भाग्य घरी येते.
९८
ज्या वाणीमध्ये प्रेम आहे, दया आहे; ज्या वाणीत क्षुद्रता नाही, त्या वाणीने इहपरलोकीकल्याण होते.
९९
मधुर प्रेमळ वाणीने मिळणारे सुख चाखल्यावरही मनुष्य कठोर बोलायला कसा धजतो?
१००
गोड बोलण्याने काम होत असताही जो कठोर बोलतो, तो पिकलेले फळ टाकून कच्चे पसंत करतो, असे नाही का?


No comments:

Post a Comment